मुरगूड मध्ये डेंग्यू ची साथ ; नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय सज्ज

Kolhapur news
By -

           


        

             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

      

रीप रिप पडणारा पाऊस,मानवी वस्तीत  साचलेली डबकी यामुळे जागोजागी डेंग्यूच्या डासांची पैदास वाढत आहे.

   त्यामुळे डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव दिसत असून नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय सावध व सज्ज झाले आहेत.सामाजिक कार्यकर्त्यांनी सुध्दा यासंबंधी सतर्कता दाखवली असून युद्ध पातळीवर या साथीचे नियंत्रण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 याशिवाय चिकन गुणीया,मलेरिया या रुग्णात सुध्दा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

    नागरी वस्त्यामध्ये डास निर्मूलन तसेच डी डी टी पावडर इत्यादी औषधांची फवारणी करण्याची गरज आहे .

    मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनास भेटून निवेदन देणार असल्याचे सोमनाथ यरनाळकर ,सर्जेराव भाट,,ओंकार पोतदार,शशिकांत दरेकर इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी कोल्हापूर न्यूज नेटवर्क ला सांगितले.