कोल्हापूर न्यूज नेटवर्क
एसटी प्रशासनातर्फे 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयांना यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी आता पास केंद्रावर जाऊन किंवा आगारात जाऊन पास घेण्यासाठी रांगत उभे राहण्याची गरज नाही. एसटी बसचे पासेस आता थेट शाळेत दिले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली जाते. तर केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहावे लागत होते. विद्यार्थिनींना होणारी गैरसाय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.