मुरगूडमध्ये जिजामाता पुण्यतिथी उत्साहात साजरी.

Kolhapur news
By -

                


        

                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     बालपणापासूनच शिवरायांच्यावर स्वराज्य स्थापनेचे संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेबांची आज पुण्यतिथी.

     जनमानसात  प्रेरणा  निर्माण करण्यासाठी त्यांच्या पुण्यतिथीचे  मोठे महत्व आहे.स्त्रियांचा सन्मान कसा करावा,रयतेचे कल्याण कसे करावे,प्रत्येक कठीण प्रसंगाला कसे तोंड द्यावे हे जिजाऊ मां साहेबांनी शिवरायांना शिकविले. 

   म्हणून आदर्श हिंदवी स्वराज्य स्थापन झाले .किंबहुना मांसा हेबांचे हेच जीवन कार्य होते.शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या   १४ व्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.

    त्यांचा जन्म यासाठीच झाला होता म्हणून त्यांची  पुण्यतिथी सुध्दा तितकीच प्रेरणादायक व पुण्यशील आहे असे विचार यावेळी विविध वक्त्यांनी मांडले.

जिजाऊ माँ साहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्याचा मान मुरगूड नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी यांना देण्यात आला. सामान्यांतूनच शिवरायांनी स्वराज्याचे पाईक तयार केले होते.सफाई पर्यवेक्षक निलेश खरात,कर्मचारी प्रकाश कांबळे यांनी पुष्पहार घालून प्रथम अभिवादन केले.

  यावेळी एस. व्ही , चौगुले व्ही .आर.भोसले,सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,तानाजी भराडे,संकेत शहा,प्रदीप सुर्यवंशी,प्रकाश पारिष्वाड,सुभाष अनावकर,सर्जेराव मांगोरे,सुनील कांबळे,हेमंत पोतदार,रमेश किल्लेदार,बबन बारदेस्कर,प्रसाद गोंधळी यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.