कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दि. 30 मे 2024 च्या पत्रांन्वये .शिक्षण संचालक (प्राथमिक )महाराष्ट्र राज्य पुणे यांनी "खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना सेवाशर्ती नियमावली 1981 मधील नियम18 ब नुसार अर्जित रजेचे रोखीकरण फक्त माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना असलेने खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अनुज्ञेय नाही "असे कळवले आहे .
ही बाब खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्यावर अन्याय करणारी असलेले सविस्तर निवेदन दिले व बारा वर्षांपूर्वी आमच्या संघटनेमार्फत प्रयत्न करून खाजगी प्राथ.शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय आहे .अशा प्रकारचा शासन आदेश प्राप्त करून घेण्यात आलेला आहे तो जोडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक (प्राथ )यांना महेश चोथे ,शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत पाठवून देण्यात आला यामध्ये "शासनाकडे संबंधित दि ९ एप्रिल २००१ व दि २३ जाने २०१३ चा शासन आदेश पुराव्याच्या बाबी म्हणून राज्य शासनाकडे पाठवून देऊन , पुन्हा सुधारित आदेश काढून रजा रोखीकरण लागू असले बाबतचे निर्देश आपल्याकडून शिक्षण उपसंचालक व .शिक्षण अधिकारी यांना द्यावेत .अशा प्रकारची विनंती या निवेदनाद्वारे केली . तसेच खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण लागू करण्याबाबतचे निवेदन मेल करून मान . शिक्षण संचालक व मान .शिक्षण आयुक्त यांना पाठविण्यात आले व राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याशी भरत रसाळे यांनी राज्याध्यक्ष या नात्याने फोनवरून संपर्क साधून बारा वर्षांपूर्वी पारित झालेले आदेश व्हाट्सअप द्वारे पाठवून त्यांच्याशी चर्चा केली व या निर्णया आधारे शासनाकडे पुनश्च मार्गदर्शन मागून खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असले बाबतचा सुधारित निर्णय कळवावा अशी विनंती केली .
शरद गोसावी ( शिक्षण संचालक , प्राथ.) यांनी सहानुभूतीने याबाबत विचार करून आपण हे पुराव्यासह निवेदन राज्यशासनाकडे पाठवू व त्यांचे मार्गदर्शन घेऊन खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असल्याबाबतचा सकारात्मक निर्णय करून घेऊ ,अशा प्रकारचे आश्वासन दिले . तसेच महेश चोथे, उपसंचालक शिक्षण विभाग यांना निवेदन दिले असता त्यांनीही तात्काळ राज्य शासनाकडे आपल्या स्पष्ट अभिप्रायासह हे निवेदन पाठवण्याचे मान्य केले . शिक्षण उपसंचालक साहेब यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष भरत रसाळे , राज्यसचिव शिवाजी भोसले व संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री मच्छिंद्र नाळे ,साताप्पा कासार , सर्जेराव नाईक ,अमित परीट , सूर्यकांत बरगे .कृष्णात चौगुले , आप्पासाहेब वागरे व जे . . पाटील आदी उपस्थित होते