लाच घेताना कागल तालुक्यातील तलाठी अँटी करप्शन च्या जाळ्यात ; कोल्हापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur news
By -

           


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        पाच हजाराच्या लाच प्रकरणी कागल तालुक्यातील  मुगळी येथील तलाठी प्रदीप अनंत कांबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पोलिसांनी या लाचखोर प्रकरणात जैनाळच्या गणपती रघुनाथ शेळके  यांच्यावरही कारवाई केली आहे. या दोघांवर मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    

    या प्रकरणातील तक्रारदाराचे मुगळी गावातील शेत जमिनीचे हक्क सोड पत्राप्रमाणे शेत जमिनीच्या डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी व नाव नोंदणी करून डायरी उतारा देण्याकरिता पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावत याप्रकरणी कारवाई केली. पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, विकास माने, सुनील घोसाळकर, संदीप काशीद, सचिन पाटील ,संदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली . मागील महिन्यात कागल तहसील कार्यालयातील महिलेला लाच घेताना पकडले होते . कागल महसूल विभागाचा लाच घेण्याचा सिलसिला सुरूच आहे. त्यामुळे या लाचखोरीला आळा घालण्याची मागणी होत आहे.