वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात 'none of the above' म्हणजे 'वरील पैकी कुणीच नाही' अर्थात नोटाला तब्बल 8 हजार 478 मते पडली आहेत.
मतदारांना एखाद्या मतदारसंघात कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही, तर ते ईव्हीएमवरील नोटाचे बटन दाबतात. यामुळे संबंधित मतदाराची कोणत्याही मतदाराला मतदान करण्याची इच्छा नव्हती हे स्पष्ट होते. यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातही नोटाला चांगले मतदान पडले. येथे मोदींसह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात नोटा हा पर्याय चौथ्या क्रमांकावर राहिला. मोदींना 6 लाख 12 हजार 970 मते पडली, तर दुसऱ्या क्रमांकावरील इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय यांना 4 लाख 60 हजार 4578 मते पडली. वाराणसीत बसपचे अतहर जमाल लारी हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 33 हजार 766 मते मिळाली.