कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड चा सर पिराजी तलाव भरला आहे.३७ फुटाची क्षमता असलेल्या या धरणात फक्त दोन इंच कमि असून उद्यापर्यंत पातळी गाठली जाईल असे व्यवस्थापन विभागाकडून समजले.
मुरगूड निढोरी रस्त्यावर अद्याप पाणी आहे.पाऊस वाढला किंवा पाटगाव धरणाचा विसर्ग वाढला तर पाण्याची पातळी वाढू शकते असे नगरपरिषद मुकादम बबन बार्देस्कर यांनी सांगितले.
दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
मुरगूड च्या जनावर बाजारात मात्र दलदलीचे साम्राज्य असून व्यापारी वर्गात खुप नाराजी आहे.
मुरगूड निढोरी दरम्यान रस्त्यावर अर्धा फुट पाणी (22/7/2024 सकाळी 6,वाजता )


