अजितदादा वेशांतर करून दहा वेळा भेटले अमित शहांना ; विमान प्रवास करताना नाव सुद्धा बदलले

Kolhapur news
By -

              


           

मुंबई :  मास्क आणि टोपी घालून वेष बदलून दिल्लीला जायचो. सत्ता नाट्यावेळी दहा वेळा गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली असे अनेक खुलासे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहेत. निती आयोगाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दिल्लीत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी गेल्या वर्षीतील सत्ता नाट्यवेळीची गुपित उलगडली. खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यावेळचे किस्से सांगितले.


सह प्रवासीही अजितदादांना ओळखत नव्हते अजित पवार यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकांचा किस्सा सांगितला आहे. "सत्तानाट्यावेळी अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये एकूण दहा बैठका झाल्या. यासाठी अजित पवार सामान्य विमानाने प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास करत होते. त्यांच्या या वेषभूषेमुळे सह प्रवासी सुद्धा आपल्याला ओळखत नसल्याचेही ते म्हणाले.

        

विशेष म्हणजे अजित पवार यावेळी नाव बदलून प्रवास करत होते. ते A. A. Pawar अशा नावाने प्रवास करायचे. याच नावाने त्यांचा बोर्डिंग पास तयार व्हायचा. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांनी मागच्यावर्षी जुलै महिन्यामध्ये शरद पवारांची साथ सोडत महायुतीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता .