कोल्हापूर न्यूज नेटवर्क
देशातील लैंगिक अत्याचार व कोल्हापूरात हिंदुत्वा वर काढलेल्या अपशब्दांचा मुरगूड येथे युवा संघटनांनी जाहीर निषेध केला.
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.बदलापूर येथील शाळेत लहान बलिकांवरील लैंगिक अत्याचार तसेच शिये येथे नराधमाने दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या गंभीर निर्दयी व विकृत घटनांचा मुरगूड येथे अनेक युवा संघटनांनी शिवतीर्थावर जाहीर निषेध केला.दोषींना कठोर व तत्काळ सजा झाली पाहीजे अशी मागणीही करण्यात आली.दुबई सारख्या देशात अशा आरोपींना तात्काळ ठार केल्याची उदाहरणे देण्यात आली.
कोल्हापूर येथे मुस्लिम संघटनांनी रामगिरी महाराज यांच्या विरोधी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.त्यामध्ये हिंदुत्वावर जहरी टीका करणाऱ्या युवकाचा निषेध करण्यात आला व रामगिरी महाराज यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी,ओंकार पोतदार,विशाल भोपळे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. जनमानसातील संतप्त भावनांना येथे वाट करून देण्यात आली. तसे निवेदनही ए पी आय शिवाजी करे यांना देण्यात आले.यावेळी अनंत फर्नांडिस,सर्जेराव भाट,तानाजी भराडे,भगवान गुरव,संकेत शहा,प्रकाश पारिष्वड,रंगराव चौगुले,मयूर सावर्डेकर,संग्राम साळोखे,पंकज मेंडके,एकनाथ खराडे,अमर चौगुले,सुभाष अनावकर,राहुल मुरगूडकर ,नाना डवरी,सुशांत कलगुटकी,पृथ्वीराज चव्हाण,रणजित मोरबाळे,यश हळदकर,इत्यादी युवकांसह नागरिक उपस्थित होते.

