कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना मिळणारा निधी बँकांनी महिलांच्या कर्ज खात्यावर किंवा अन्य कोणत्याही खात्यावर वर्ग न करता त्यांना रोखीने देणेत यावा असे निवेदन भारतीय जनता पार्टीने महिला भगिनिंच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँक व बँक ऑफ इंडिया यांना दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने सदरची रक्कम बहिणींना महिला सबलीकरण हेतूने दिली आहे.रक्षाबंधन भेट म्हणूनही तिचा उपयोग महिलांना झाला पाहिजे असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दगडु शेणवी यांनी सांगितले.
बँक मॅनेजर यांना निवेदन देण्यासाठी दगडु शेणवी ,विजय गोधडे,प्रवीण चौगुले,निवृत्ती कांबळे,मधुकर शिंगे हे भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.


