कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नौदल दिनानिमित्त राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाची अस्मिता आहेत देशामध्ये त्यांचे अनेक पुतळे आहेत त्यांची कोणतीही दुरावस्था झाली नाही मात्र अवघ्या काही महिन्यातच त्यांच्या या पुतळ्याची झालेली अवस्था बघवत नाही. संबंधित मूर्तिकारावर तसेच कॉन्ट्रॅक्टदारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी बोलताना ओंकार पोतदार यांनी केली. यावेळी मूर्तीचे पहिल्यापासूनच काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या काही महिन्यांमध्येच मूर्तीचे आवरण निघू लागल्याचे काही शिवभक्तांनी पाहिले होते आणि त्या संदर्भात नौदलाला कळवले देखील होते असे समजते मात्र त्यावर कोणताही उपाय केला नाही, परिणामी महाराजांचा पुतळा कोसळला आणि सर्व शिवप्रेमी मध्ये संतापाची भावना निर्माण झाली.
यावेळी संजय घोडके आणि प्रदीप वर्णे यांची मनोगते झाली .शिवभक्त सर्जेराव भाट, तानाजी भराडे, ओंकार पोतदार, संकेत शहा, रणजीत मोरबाळे, पृथ्वी चव्हाण, जगदीश गुरव, समाधान पोवार, रंगराव चौगुले ,मयूर लोकरे, योगेश लोकरे,विकी साळोखे, अजित, चौगले, राहुल सूर्यवंशी, मयूर मिसाळ सुभाष अनावकर, सुशांत कलकुटकी यांच्यासह शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

