कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील पंचशील नगर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'अभिवादन' सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचशील नगर मध्ये हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवाला आदरांजली वाहिली.
चिखली जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले , बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह रावसाहेब भोसले , सरपंच युवराज कुंभार , राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक महान नेते नव्हते, तर ते भारताचे संविधान निर्माते, समाजसुधारक आणि खऱ्या अर्थाने मानवतेचे पुजारी होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अन्याय, अत्याचार आणि विषमता यांच्याविरुद्ध लढा दिला.
बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले म्हणाले , बाबासाहेबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. कारण त्यांना माहीत होते की , शिक्षण हेच खऱ्या स्वातंत्र्याचे साधन आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले.
राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले म्हणाले, आपण आज ज्या अधिकारांचा उपभोग घेतो, ते सर्व बाबासाहेबांच्या संघर्षाचे फलित आहे. म्हणूनच आपण त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
यावेळी माजी उरसरपंच विजय घस्ती, खडकेवाडा केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख संजय चिखलीकर, वैभव गळतगे , विक्रम गळतगे, ओमाजी कांबळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. या अभिवादन सोहळ्याचे संयोजन पंचशील नगर मधील समस्त समाज बांधवांनी केले.
दरम्यान , शिवानी विजयसिंह भोसले (जिल्हा परिषद सदस्या) यांनी आंबेडकर समाज मंदिर ला आठ फॅन आज दिले .
---------------------


