महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Kolhapur news
By -

                  



     निपाणी :  फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेचे वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करणेत आली . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  सुभाष डांगरे सर    होते .साताप्पा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


याचबरोबर आज संघटनेच्या वतीने "योद्धा" या नावाने न्युज चॅनेल चालु करणेत आले याच बरोबर डिजिटल बोर्ड लावणेत आला. येणाऱ्या पुढील काळात फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने सर्व सोयींनी सज्ज अशी रूग्णवाहिका ( ॲम्बुलन्स ) सुरू करण्याचा मानस आहे. याविषयी पत्रव्यवहार चालू आहे. सध्या वाॅट्सपच्या माध्यमातून 8 ब्लड डोनर ग्रुप असणाऱ्या या ग्रुपला आलेल्या मागणी नुसार गरजवंत रूग्णांना ग्रुप मधील सदस्यांकडून हवे असलेल्या ठिकाणी जाऊन रक्तदान केले जात आहे. यावेळी वार्षिक सभा संपन्न झाली , या सर्व समारंभाकरीता संघटनेचे सर्व स्तरातील पदाधिकारी हजर होते. 



             -------------------