मुरगूडचे ॲड.राणाप्रतापसिंह सासने यांची शिवसेनेच्या राज्य कायदा विभागाच्या उपाध्यक्ष पदी निवड

Kolhapur news
By -

 

             





                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


       मुरगूड येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. राणाप्रतापसिंह रा.सासने यांची शिवसेनेच्या (शिंदे )राज्य कायदे विभाग संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. तसेच याच संघटनेच्या विभागीय कायदे विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.


  प्रसार माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार व प्रसार   करण्यासाठी व पक्षाची कायदे विभाग संघटना वाढवण्यासाठी मी कटीबद्ध  आहे. महाराष्टाचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे यांच्या आदेशा नुसार व मार्गदर्शनाखाली मी पक्ष वाढी साठी सातत्याने काम करत राहीन.


 माजी खासदार संजयदादा मंडलिक हे आमचे नेते असून त्यांच्या समवेत शिवसेनेच्या व शिवछत्रपतींच्या सेवेत काम करतांना मला खुप आत्मिक आनंद मिळेल. माझे वडील रामराव सासने हे कट्टर शिवभक्त होते व शिवचरित्र  व्याख्याते होते. व्याख्यानातून राज्यभर त्यांनी शिवछत्रपतींचे आचार आणि विचार यांचा प्रसार केला आहे.त्यांची प्रेरणा घेऊनच मी राज्यभर संघटनेच्या वाढी साठी प्रयत्न करेन.शिवसेनेच्या कायदे  विभागाचे अध्यक्ष  ॲड.हेमंत केंजा ळकर व सचिव ॲड.अनिल दळवी यांनी सासने यांच्या या निवडीची घोषणा 11,एप्रिल 2026 च्या एका पत्राद्वारे केली आहे.  त्यांच्या या निवडी बद्धल मुरगूड येथील शिवसेना संघटने मार्फत अभिनंदन करण्यात आले.



         -------------------------------