'जनसेवा हीच ईश्वर सेवा' - संजय मंडलिक

Kolhapur news
By -

 

            




           कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


'जनसेवा हीच ईश्वर सेवा' या भावनेतून आजवर कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी मी काम करत आलो आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेले अभूतपूर्व प्रेम आणि आशीर्वाद पाहून मन अत्यंत भारावून गेले आहे  असे प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले. 


 संजय मंडलिक म्हणाले , कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले  शिव सैनिकानसह माझे लाडके बहाद्दर कार्यकर्ते, आदरणीय नेते मंडळी, पदाधिकारी आणि हितचिंतक यांचा उत्साह पाहून मला असे जाणवले की, राजकारणापलीकडे जाऊन आपण एक मोठे कुटुंब तयार केले आहे. भर उन्हात, प्रवासाचे कष्ट सोसून केवळ सदिच्छा देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, हीच माझ्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.


 ती पुढे म्हणाले , तुमच्या या शुभेच्छा केवळ शब्द नाहीत, तर माझ्यासाठी ती एक मोठी ऊर्जा व जबाबदारी आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपल्या सर्वांच्या हितासाठी भविष्यातही आपण दिलेल्या या ऊर्जेमुळे मी तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने कार्यरत राहीन, अशी ग्वाही यानिमित्ताने आपल्याला देतो.



            ----------------------