कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील पंचशील नगर मधील "डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली" येथे इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक 12 /4 /2026 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 8.00 पर्यंत सलग बारा तास वाचन उपक्रमाने विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .या सदर उपक्रमामध्ये 35 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सकाळी 8.00 वाजता शाळा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव कांबळे (माजी सैनिक) व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .
यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवर संजय चिखलीकर सर (केंद्रप्रमुख) ,आयु.बाबासाहेब कांबळे ,सर (मुख्याध्यापक कन्या विद्यामंदिर चिखली), आयु.राजेंद्र कोरे (कृषी अधिकारी ), उमाजी कांबळे सर विजय घस्ती (ग्रामपंचायत सदस्य) बाळासो घस्ती, दादासो चिखलीकर (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) . मुख्याध्यापक विवेक गवळी सर , विशाल चिखलीकर व प्रा.जी.बी.कांबळे सर या सर्व मान्यवरांनी सदर "वाचन उपक्रमाचे" महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेचा समाजाचा, गावचा नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयाने पछाडून वाचन करायला हवे असे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख मान्यवरांमध्ये पद्माकर कश्यप, प्रणव कांबळे उपस्थित होते. सदर वाचन उपक्रमामध्ये वाचनाबरोबरच प्रश्नमंजुषा ,पुस्तक परीक्षण, "चाचणी परीक्षा" सुद्धा घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी "विपश्यना साधना" ध्यानधारणा सुद्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांना सदर उपक्रमातील विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनाची सोय वाचन उपक्रम आयोजक समिती सदस्य महादेव कांबळे( माजी सैनिक) यांच्या माध्यमातून करण्यात आली.सदर उपक्रमाच्या सांगता समारंभा नंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच सर्व समाज बांधवांनी सदर उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
-----------------------


