तहानलेल्यांना पाणी पुरवण्यासाठी मुरगूड नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती सत्यजितसिंह पाटील यांची धडपड.

Kolhapur news
By -

 



           




        कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

   

     शहरात काही ठिकाणी नळ फुटल्याने गळती निर्माण झाली आहे. गळती शोधून काढण्यासाठी कर्मचारी जीवाचे रान करत आहेत. पन्नास ते साठ अंश तापमान असलेल्या उन्हात त्यांना काम करावे लागते त्याला खड्डे काढावे लागतात.तहानलेल्या नागरिकांना पाणी पुरवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे मानून ते गळती शोधत आहेत.


 नगर परिषदेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती सत्यजितसिंह पाटील यांनी या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. कामाच्या ठिकाणी ते स्वतः जातीने उपस्थित राहून कामकाज पाहत होते. घामाघुम झालेल्या कर्मचाऱ्यांची अवस्था पाहून त्यांनी त्यांच्यासाठी शीत पेयांची व नाष्ट्याची सुद्धा जागीच सोय केली. कर्मचाऱ्यांना हुरूप आला. त्यातील उपलाने यांनी सत्यजित सिंह यांचे वडील अजित सिंह पाटील यांची आठवण सांगितली. ते ही पूर्वी पाणीपुरवठा समितीचे सभापती होते. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून कामगारांना प्रोत्साहन दयायचे. कोल्ड्रिंक पुरवायचे.


    ए सी रूम मध्ये बसून कर्मचाऱ्याना  फोन वरून दम देणारे अनेक नगरसेवक व कार्पोरेटर नागरिकांनी पाहिले आहेत. अशा नेत्यांना नागरिकसुद्धा तात्पुरता मान देतील. खुर्ची गेली की त्यांची किंमत उरत नाही. नगरसेवक मधील सेवक या शब्दाला सत्यजित सिंह यांनी सलाम केला आहे. खुर्ची मुळे व्यक्तीला सन्मान मिळत नसतो तर व्यक्तीच्या सेवा भावी  नेतृत्वा मुळे खुर्चीची  शोभा वाढत असते हे वास्तव  सत्यजितसिंह पाटील यांनी  सिद्ध केले अशी तहाणलेल्या नागरिकांच्या मध्ये चर्चा आहे.


 घागरी आणि माठ घेऊन पाण्यासाठी उन्हात धावत सुटायचे ते दिवस सुद्धा भगिनींना आठवल्या शिवाय राहिले नाहीत. या सेवेला एक सलाम.



     

    



     


     


       -----------------------------