कोल्हापूर न्यूज / वि . रा.भोसले
हा लेख बांगला देशातील विकृत मनोवृत्तीच्या कट्टर पंथीय लोकांच्या थोबाडात लगावण्यासाठी आहे.आणि झोपलेल्या भारतीय समाजाच्या तोंडावर उकळलेले पाणी फेकण्याकरिता आहे.
एका हिंदू कुटुंबातील गोंडस मुलीवर व आईवर बलात्कार करून वडिलांना त्यांच्या समोर हाल हाल करून मारण्यात आले.घर पेटवून सर्वांना जिवंत जाळण्यात आले.
याला विकृत म्हणायचं नाही तर काय ?
बांगला देशातील विद्यार्थी आंदोलन कशासाठी होते ?
तिथल्या आरक्षण प्रश्नावर.
सरकार उलथले.प्रश्न सुटला.मग हे बलात्कार आणि हत्या कशासाठी.?
या पिशांच्यापासून सुरक्षितपणे निसाटावे म्हणून हजारो भयभीत हिंदू भारतात येण्यासाठी सीमेवर दाखल झाले.त्यांना बी एस एफ च्या जवानांनी भारतात येऊ दिले नाही कारण एक कोटी तीस लाख बांगला देशी हिंदूंना आश्रय देणार तरी कसा व कोठे ?
सीमेवरचे हिंदू परत गेले. ढाका शहरात त्यांनी लाखांचे मोर्चे काढले ,घोषणा दिल्या,भजने म्हंटली आणि संघटनांची ताकद दाखवली.अतिरेकी आता मुस्काडात मारल्या सारखे गप्प बसले आहेत. बी एस एफ च्या जवानांनी त्यांना जणू आव्हान स्वीकारायला लावले, संघर्ष करायला शिकवले.
भारतीयांनो या असल्या विकृत प्रकारा विरोधात तुम्हीं कधी जागे होणार.'भारतियांनो' म्हणजे त्यात सर्व आले,जे या देशावर प्रेम करतात ते हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध सुध्दा.
जयश्री शिंदे सारख्या किती मुली या विकृत वासनांध अतिरेक्यांकडून मरू देणार ?
नुसती भजनं आणि जप करून तुमचा देव पावत नाही.घोषणा देत लाखोंचे मोर्चे निघाले पाहिजेत.मराठा बांधवांच्या त्या एक्कावन्न मोर्चा सारखे.
जे जे राष्ट्र विरोधी आहेत त्यांच्या विरोधात तुम्हाला एकजूट झालेच पाहिजे.केवळ टोमॅटो,आणि पेट्रोल च्या भावावर ओरडू नका.परिस्थिती नुसार ते वर खाली होत रहातील.
ही विकृती मात्र तुम्हाला गाडायलाच पाहिजे.
मिरवणुकीवर चार भुतं दगडं मारतात म्हणून तुम्ही हजारो माणसं जीव वाचवायला पळत सुटताय...
शिवाजी, संभाजी,बाजी,तानाजी,संताजी ,आणि राणा प्रताप यांनी तुमच्यासाठीच प्राण दिले ना ?
भगवा नुसता नाचवून किंवा घराच्या फाटकावर लावून चालत नाही.तो हृदयात जागवा मनात ठसवा.
तिरंगा त्याचा थोरला भाऊ आहे हे विसरू नका.
बांगला जागा झालाय, भारतीयांनो तुम्हीं सुध्दा जागे व्हा.
जय हिंद


