खाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेत सव्वा नऊ टक्के व्याज दरांने 45 लाखापर्यंत कर्ज ;चेअरमन सूर्यकांत बरगे यांची सर्वसाधारण सभेत घोषणा

Kolhapur news
By -

 

          


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या सभासदांना सव्वा नऊ टक्के व्याज दराने 45 लाखापर्यंत कर्ज देण्याची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन सूर्यकांत बरगे यांनी केली . ते कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते .  श्रीराम हॉल कसबा बावडा येथे ही सभा खेळीमेळीत  संपन्न झाली. संस्थापक व तज्ञ संचालक श्री भरत रसाळे यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. 

           

    अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन सूर्यकांत बरगे म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात पतसंस्थेस विक्रमी 2कोटी  45 लाखावर नफा झाला असून त्यातून सभासदांना 15 टक्के लाभांशाबरोबरच 28% सभासद भेट असे एकूण 43% लाभ  दिला  जाणार आहे . त्याचबरोबर दिवाळी भेट म्हणून सभासदांना गोकुळचे अर्धा लिटर तूप ही दिले जाणार आहे.सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्यात आला असून 45 लाखापर्यंतचे कर्ज फक्त सव्वा नऊ टक्के व्याज दरांने दिले जाणार आहे .सभासदच्या साठी कुटुंब कल्याण योजना सुरू केली असून या योजनेतून सभासदांना 35 लाखापर्यंत रिस्क कव्हर मिळणार आहे .या योजनेस सहकार खात्याची मंजुरीही घेतली आहे. उत्तरोत्तर पतसंस्थेने भरीव कामगीरी करून 450 कोटींची उलाढाल पूर्ण केली आहे.


   यावेळी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे म्हणाले की , आम्ही पतसंस्थेनचे फक्त विश्वस्त असून सभासदांच्या हितासाठी  यापुढेही  अधिकाधिक चांगल्या योजना राबवण्याचा मानस असलेचे सांगितले .

       

    यावेळी स्वागत संचालक अमित परीट यांनी केले.सचिव साताप्पा कासार यांनी नोटीस वाचन केले तर प्रोसिडिंग वाचन कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सल्लागार समिती सदस्य सौ विद्या पाटील यांनी केले व आभार व्हाईस चेअरमन सर्जेराव नाईक यांनी मांनले

           

यावेळी झालेल्या कामकाजामध्ये  संस्थेचे संचालक साताप्पा कासार , शिवाजी सोनाळकर , राजेंद्र कोरे ,संतोष आयरे  यांच्यासह गोरख वातकर , पी .वाय . पाटील , पांडूरंग गवळी , सागर पाटील यांनी भाग घेऊन चांगली चर्चा घडवून आणली . यावेळी माजी चेअरमन शिवाजी भोसले ,संचालक सर्वश्री सौ माधुरी घाटगे, मच्छिंद्र नाळे, कृष्णात चौगले, वसंत पाटील, राजेश कोंडेकर, महादेव डावरे , सौ वर्षाराणी वायदंडे सौ रोहिणी येडगे सल्लागार समिती सदस्य सर्वश्री संभाजी सुतार ,आप्पासो वागरे ,पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर, दशरथ कांबळे व सभासद असंख्य संख्येने उपस्थित होते.