मुंबई : राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्यात आलं आहे. तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं विलीन करुन हे एकच पद करण्यात आलं आहे. तसंच ज्या ग्रामपंचायतींचं वार्षिक उत्पन्न ७५ हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.