आपल्या गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना सदैव सन्मानाचीच वागणूक - पालकमंत्री हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

 

          


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    गेल्या पंचवीस वर्षात आपण कागल तालुक्यामध्ये प्रचंड विकास कामे केलेली आहेत. वैद्यकीय सेवेसह अन्य कोणत्याही समस्या घेऊन एखादी व्यक्ती आपल्याकडे आल्यास त्याचा गट तट न पाहता आपण त्यांच्या समस्या  सोडवून त्यांचे समाधान करून न्याय दिला आहे . सर्वसामान्यांचे हित नजरेसमोर ठेवून आपण आजपर्यंत कार्यरत राहिल्यामुळेच ऐन निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात  विरोधी गटाचे कार्यकर्ते आपल्या गटात प्रवेश करीत आहेत ही आपल्या  कामाची पोच पावती आहे. आपल्या गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना सदैव सन्मानाचीच  वागणूक दिली जाईल असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. 


      नानीबाई चिखली येथील सोयाबीन व्यापारी सागर कृष्णात पाटील,कृष्णा शंकर पाटील, आण्णासो शंकर पाटील, शितल सागर पाटील, युवराज महादेव पाटील, नितीन नारायण मगदूम यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. 


       यावेळी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव  तुकान, बशीर नदाफ, धीरज मगदूम, बाजीराव वाडकर, अब्बास जमादार, राजू चौगुले, बाळू घस्ती, बाबुराव वाडकर, गैबी नाईक, रहिम जमादार, वाशीम सय्यद, अमाेल चौगुले, रोहित हवालदार, हकीम आणुरे, संतोष कोगनुळे, रमेश पवार आदी उपस्थित होते. 


               -----------------------------------