२०२४ चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर २०२९ चा मुख्यमंत्री मनसेचा असेल - राज ठाकरे

Kolhapur news
By -

 

            


   मुंबई: यंदाची निवडणूक रंजक होणार असून सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. त्यातच, राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत केले. यामुळे राज ठाकरेंनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान केले आहे. तसेच, मनसेच्या पाठिंब्यावरच हा भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही राज ठाकरे म्हणाले.


   राज ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळीमध्ये मनसेचा उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, 2024 निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी माहीम मतदारसंघात पुतण्या अमित ठाकरे विराधोत उमेदवार दिला आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंसाठी मी विचार केला. विरोधातील पक्ष असला तरी मी राजकारण आणि नातेसंबंध जपत असतो. 

              ------------------------