मुंबई:राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावी प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रचाराचा मेगा प्लॅन तयार केला आहे. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बडे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. मोदी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील अनेक जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या सुत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात एकूण 8 सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भापजचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जास्तीत जास्त सभा घेण्याची जबाबदारी असणार आहे.
---------------------------------

