कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सोमवार सायंकाळी ५.३० चा मुहूर्त.वसूबारसने दीपावलीचा शुभारंभ झाला.वासरासह गाईची पूजा पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते.गाय वासरू म्हणजे दया,क्षमा शांती , सहिष्णुता अशा ऊच्च गुणांचे प्रतिक मानले जाते.हिंदू धर्मातील सर्व सणांना अशी सांस्कृतिक परंपरा असते.
एवढ्यावर ही प्रथा थांबत नाही. वातावरणातील प्रसन्नता ,आरोग्य आणि कौटुंबिक समृद्धी यांचेही प्रतिक म्हणून हिंदू धर्मात गो मातेला खुप वरचा दर्जा प्राप्त आहे.
याच वर्षी महाराष्ट्र सरकारने गाईला राज्यमातेचाही दर्जा दिला आहे.
मुरगूड मधील शिवभक्तांनी आणि हिंदू धर्म रक्षक संघटनांनी गोमातेचे हे महात्म्य नागरिकांच्या निदर्शनास आणण्यासाठी ग्रामदेवता अंबाबाईच्या मंदिरातच वसुबारस पुजेचे आयोजन केले.माता भगिनींना पूजेचे आवाहन केले.
प्रत्यक्ष गाय वासरु आंबाबईच्या चरणी नतमस्तक झाले आणि भगिनींना खऱ्याखुऱ्या वसुबारस पूजेची पर्वणी मिळाली.या पर्वणीचा आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडून वहात होता.
शिवभक्त आणि हिंदूधर्म सेवकांचे त्यांनी आभार मानून ऋण व्यक्त केले.
------------------------


