कोल्हापूर न्यूज नेटवर्क
१३.१२.१९४२.गारगोटी , ता.भुदरगड येथील तत्कालीन ब्रिटिश खजिन्या वर हल्ला .ना पोलिसांची भीती ना मरणाची भीती. ब्रिटिशांनी आपल्या हुकुमी राजवटी साठी भारतमातेला लुबाडून साठवलेले असे अनेक खजिने देशभर होते.
त्यातलाच हा एक.१९४२ ला देशभर स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली.भारत छोडो च्या आंदोलनात अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
गारगोटी येथील हल्ल्यात देखील सात सात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ,तुरुंगवास भोगले.१३.१२.हा त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याचा दिवस होय.
या दिवशी मुरगूड वेशीवर असलेल्या हुतात्मा स्मारकात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.तेथून युवकांनी क्रांती ज्योत नगराच्या मध्यवर्ती असलेल्या हुतात्मा तुकाराम चौकात दौडत नेली.
क्रांतिकारकांच्या आणि भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.प्रा. डी. डी.चौगुले ,माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, ओंकार पोतदार इत्यादींनी ४२ च्या क्रांतीचे महत्व विशद केले.
विठ्ठल भारमल,माजी नगरसेवक राजाराम गोधडे , बी . एस. खामकर, सूर्यवंशी ,उद्योगपती जोतीराम सूर्यवंशी, सर्जेराव भाट,सुभाष अनावकर, पी डी मगदूम, सुनील डेळेकर,महादेव वागवेकर,शिंदे गुरुजी, सौ.आदिती सूर्यवंशी,बबन बारदेसकर,भगवान लोकरे आदी उपस्थित होते.जयवंत हावळ यांनी प्रास्ताविक व संदीप भारमल यांनी आभार प्रदर्शन केले. संकेत भोसले यांनी स्वागत केले.
---------------------------



