कोल्हापूर न्यूज नेटवर्क
१३.१२.१९४२.गारगोटी , ता.भुदरगड येथील तत्कालीन ब्रिटिश खजिन्या वर हल्ला .
ना पोलिसांची भीती ना मरणाची भीती. ब्रिटिशांनी आपल्या हुकुमी राजवटी साठी भारतमातेला लुबाडून साठवलेले असे अनेक खजिने देशभर होते.
त्यातलाच हा एक.१९४२ ला देशभर स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली.भारत छोडो च्या आंदोलनात अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
गारगोटी येथील हल्ल्यात देखील सात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ,तुरुंगवास भोगले.
१३.१२.हा त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याचा दिवस होय. त्यापैकीच एक नानीबाई चिखलीतील हुतात्मा मुल्लू चौगुले यांना चिखलीकरांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा क्रांतिवीर मल्लू चौगुले यांच्या बलिदान दिनानिमित्त चिखलीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजता चिखलीकरांच्यावतीने गारगोटी येथे क्रांतीज्योतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही ज्योत चिखलीकडे आणण्यात आली. लक्ष्मी मंदिर येथे क्रांतीज्योतीचे आगमन झाल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते ज्योतीचे पूजन करण्यात आले . त्यानंतर गावातून ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली .चिखली इंग्लिश स्कूल चिखलीचे विद्यार्थी व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. चिखलीतील हुतात्मा स्मारक येथे फोटो पूजन व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे जीएसटी विभागाचे उपायुक्त राजू चौगुले यांच्या वतीने चिखलीसह परिसरातील विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी गावातील नागरिकांनी घरासमोर रांगोळी काढून मेणबत्त्या लावून क्रांतिवीरांना अभिवादन केले.
चिखलीचे सरपंच, उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील,सर्व सेवा संस्था ,दूध संस्थाचे पदाधिकारी व सदस्य,आजी माजी सैनिक संघटना सदस्य, चिखली इंग्लिश स्कूल, कुमार विद्या मंदिर , कन्या विद्या मंदीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर , यशवंतराव भोसले माध्यमिक विद्यालय खडकेवाडा या शाळातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक , विद्यार्थी व सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. यासाठी क्रांतिवीर हुतात्मा हरिबा बेनाडे व क्रांतीवर मल्लू चौगुले स्मृतिदिन सोहळा समिती ,डायमंड ग्रुप, चौगुले परिवार,सुभाष गळतगे यांचे सहकार्य लाभले.
क्रांतिकारकांच्या आणि भारतमातेच्या
जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
-------------------------------------------------------


