कोल्हापूर न्यूज / वि .रा .भोसले
चिमगावच्या चिमुकल्या बहिणभावांचा दुर्दैवी अंत ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. उमलण्यापूर्वीच जीवन कळ्या नियतीने खुडून घेतल्या आहेत.
गुलजार यांनी लिहिलेलं ते अजरामर गीत सुध्दा इथे ओशाळले आहे.
" जिंदगी तुझसे नाराज नही ,हैराण हुं मैं !."
जीवन एकदाच मिळते ,ते भरभरून जगायचे असते .वेळोवेळी येणाऱ्या समस्या हैराण करत असतात .त्यांना तोंड देत राहायचं.जिंदगीला त्यासाठी दोष द्यायचा नसतो. असा मौलिक संदेश या गीतात दिलेला आहे.त्यामुळेच या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक पार केले होते.
चिमगावच्या दोन गोंडस चिमुकल्यांना मात्र जिंदगी ने न्याय दिला नाही असेच म्हणावे लागेल.
यात दोष कोणाचा ?
बदललेल्या अत्याधुनिक जीवन शैलीचा थोडा आढावा घेऊया.
लहान मुलांना बाजारातील गोळ्या ,चॉकलेट्स, मॅगी,कुरकुरे,केकस, कॅडबरी इत्यादी खाऊचे पदार्थ आवडतात.ते कधीकधी इतके प्राण घातक सुध्दा ठरतात हे घटनेने दाखवून दिले आहे.भेसळीचे असंख्य नमुने समाज माध्यमावरील व्हिडिओ व अन्य संदेशातून आपल्याला पहायला मिळतात. अन्न आणि औषध प्रशासन सुध्दा वेळोवेळी माहिती देत असते.
बाजारातील खाद्य उत्पादने स्वस्त मिळतात म्हणून विकत घेण्याची घाई केली जाते.पण जीवन इतके स्वस्त नाही.
त्या दोन चिमुकल्यांचे जीवन मौल्यवान होते . त्या कुटुंबावर दुःखा चे आभाळ कोसळले आहे .
याला जबाबदार कोण ?
या घटनेवरून अशा असंख्य कुटुंबाना शिकता येण्यासारखे आहे.
या चिमुकल्यांना मात्र नियतीने न्याय दिला नाही
असेच म्हणावे लागेल.
निष्पाप जीवांना तू असं कसं काय ओढून नेऊ शकतेस ?
' जिंदगी तूझसे नाराज हुं '
असे अतीव दुःखाने म्हणावेसे वाटले.
---------------------------------

