महाराष्ट्र आता थांबणार नाही. नवे सरकार नव्या योजना.नवी घोषणा.

Kolhapur news
By -

 

         


    


             कोल्हापूर न्यूज  /  वि .रा.भोसले


महायुतीचे सरकार आज पुन्हा सत्तेवर आले.

 देवेंद्र फडणवीस उर्फ देवभाऊ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.लोकप्रिय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.अजिदादा सहव्यांदा उपमुख्यमंत्री झाले.

"महाराष्ट्र आता थांबणार नाही,"

अशी नवी घोषणा या सरकारने आधिच दिली आहे.

      जनतेच्या मनातले हे सरकार आहे हे आधीच सिद्ध झालंय.मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा खुप रंगली होती. देवेंद्रजींनी यात बाजी मारली आहे.

   

  देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा ही शपथ घेतात.मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदेच्या  कारकिर्दीत उपमुख्य मंत्री पद सुध्दा स्वीकारले .कसलीही तक्रार नाही ,दंगा नाही ,नाराजी नाट्य नाही.केवळ पक्ष शिस्त म्हणून त्यांनी तेही पद भूषविले .एकनाथ शिंदे जे धडाडीचे निर्णय घेत होते त्या सर्वांना त्यांनी नुसता पाठिंबाच दिला नाही तर ते निर्णय स्वतःचे म्हणून राबवले.लाडक्या बहिणींच्या राख्या अगदी  खांद्यापर्यंत दोघांनीही बांधून घेतल्या .त्यांची ही लोकप्रियता पाहून महाविकास आघाडीने सुध्दा तशा घोषणा दिल्या.त्याला तसा खुप उशीर झाला होता.

   

  देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक उक्तीत आणि कृतित विनम्र भाव होता.विरोधकांनी व विशेषतः उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या सर्व शिव्या शिव्या त्यांनी सहन केल्या.धमक्या पचवल्या.एक तर तू रहाशील किँवा मी तरी राहीन अशी उद्धव यांची उर्मट भाषा सुध्दा त्यांनी विनयाने परतवली.त्यांचे समर्थक म्हणायचे ,तुमच्याकडे त्यांच्या कुंडल्या आहेत म्हणता तर त्या एकदा काढा आणि त्यांना हिसका दाखवा.

  

 देवेंद्रजी नुसते स्मित हास्य करायचे.शरद पवार यांच्या पक्षाने तर एका जाहिरातीत सरळ त्यांना अनाजी म्हंटले.हा कुत्सित टोमणा सुध्दा त्यांनी सहन केला.पेशव्यांनी छ्त्रपती ना धोका देऊन राज्य घेतले अशी भाषा सुध्दा शरद पवार पक्षाकडून ऐकायला मिळाली होती.त्यांनी स्वतः मात्र छत्रपतींना कधि साधा हार सुध्दा कधी घातला नाही.देवेंद्र फडणवीस भाषणाची सुरुवातच शिवरायांच्या जयजयकाराने करायचे.

 

 जातीभेद महाराष्ट्राने कधी सहन केला नाही.तसे असते तर सचिन तेंडुलकर नावाच्या ब्राम्हणाला भारतरत्न द्या म्हणून तो रस्त्यावर आला नसता.सुनील गावस्कर,सावरकर यांच्या साठी सुध्दा महाराष्ट्राने मुठी आवळल्या.

   

 एकनाथजी तर शिव्या खाऊनच घट्ट झाले.खोके,मिंधे,गद्दार,आणखी काय काय. ? त्यांनी मात्र चोख प्रत्युत्तर सुध्दा दिले.आनंद दिघेंचे दोन चित्रपट त्यांच्या पुढाकाराने आले.जे सांगायचे होते ते तोंड न उघडता सांगून टाकले.

    

अजितदादा आधी धडाडीचे नेते.पेट्रोल पंपावरच्या कार्यकर्त्यांच्या मदतीला ते फोनवर धावून जायचे.पत्नी हारली तरी जिद्द सोडली नाही.

   महाराष्ट्र आता थांबणार नाही असे घोषवाक्य या नव्या त्रिकुटाने दिले आहे.

    घोडा मैदान हाकेच्या अंतरावर आहे.


          ------------------------------------