कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील बौद्ध नगर व पंचशील नगर मधील बौद्ध -भीम अनुयायांनी "भीमा कोरेगाव" येथील शौर्य स्तंभाची प्रतिकृती बौद्ध नगर चिखली येथे बनवली. मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी रात्री ठीक 12.00 वा. समस्त बौद्ध नगर पंचशील नगर मधील नागरिकांनी एकत्र येत तथागत भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे तसेच "संविधान प्रतीचे" यावेळी पूजन करण्यात आले.
यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून तसेच सामूहिक बौद्ध वंदना पठण करून "भीमा कोरेगाव" येथील लढाईतील शूर वीरांना मानवंदना दिली याप्रसंगी शहीद झालेल्या सैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला व "जय भीम"चा जयघोष केला. समाजातील भीमा कोरेगाव लढाईमध्ये शौर्य दाखवलेल्या झालेल्या शूरवीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील नव तरुणांनी आपले कर्तुत्व सर्व क्षेत्रात गाजवावे असे मान्यवरांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी समाजातील महिला, पुरुष तसेच बाल उपासक- उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
-----------------------------------------------



