कोल्हापूर न्यूज नेटवर्क
चिखली इंग्लिश स्कूल,चिखली ता.कागल
या विद्यालयाने शासकीय चित्रकला परीक्षा (इंटरमिजिएट) २०२४ परीक्षेत १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
या यशस्वी निकालामध्ये
07 विद्यार्थ्यांनी A GRADE
11 विद्यार्थ्यांनी B GRADE,
24 विद्यार्थ्यांनी C GRADE
मिळवत विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व कला मार्गदर्शक शिक्षक नजीर नाईक यांचा संस्थेचे मार्गदर्शक सदाशिव तुकान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच कागल तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये चिखली इंग्लिश स्कूल चिखली या विद्यालयाचे शिक्षक एस के सिरसे यांचा शिक्षक उपकरणांमध्ये द्वितीय क्रमांक व विद्यार्थी उपकरणांमध्ये चतुर्थ क्रमांक आलेबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण देवर्षी व धीरज मगदूम यांच्या हस्ते एस के सिरसे व सहभागी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस बोरवडेकर , सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
--------------------------------------------------


