कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली .दिवाळी आणि दसऱ्याच्या दरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळाले ,आणि सणासुदीच्या काळात बाजारात एकच गर्दी उसळली. महिलांनी नवऱ्याकडे पैसे मागणेच बंद केले .या उसळलेल्या गर्दीचा एवढा मोठा फटका बसला की तो फटका बंटी पटलांना माहित आहे असे नामदार हसन मुश्रीफ यांनी म्हणताच एकच हशा पिकला .
--------------------------------------------------------
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्यास काय करावे ?
लाडकी बहीणीने स्वतःचे नाव लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे की नाही, ते पाहावे.
• नाव लिस्टमध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
• आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे.
• ऑनलाइन बँकींगच्या मदतीने खात्यात पैसे आले का, हे चेक करावे.
• जर यानंतरही तुम्हाला पैसे आलेच नसतील तर शेवटी 181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करावी.
181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यावर 'लाडकी बहीण योजने'चा अर्ज करूनही पैसे का आले नाही याची चौकशी करावी. मिळालेल्या माहितीनुसार पुढे कार्यवाही करावी. जानेवारी संपेपर्यंत जर लाडक्या बहीणींच्या बँकेत हप्ता जमा झाला. मात्र तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी.
-------------------------------

