बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे या आरोपींवर आता मोक्काअंतर्गत खटला चालवला जाणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी आणि सीआयडीकडे देण्यात आला आहे. हत्येच्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे येत असले तरी त्याला हत्येप्रकरणी अटक झालेली नाही. तो सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे, त्यामुळे त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही.
- -----------------------------

