कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. तरी दि.११/०१/२०२५ इ. रोजी पासून ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ. प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर २ रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय दि.१०/०१/२०२५ इ. रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होवून निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. संघाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हैस दूध उत्पादकांसाठी दिलासा देणारी दर वाढ केली आहे. दूध उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यामुळे दूध उत्पादकांना नक्कीच फायदा होणार आहे.
--------------------------------

