मुरगूडच्या गैबी पीर उरुसात ,गलफ ,कीर्तन आणि हळदी कुंकू सुध्दा.

Kolhapur news
By -

 

          


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   दरवर्षी प्रमाणे यंदाही कडाक्याच्या थंडीत मुरगूड चा गैबी पीर उरूस साजरा होत आहे.अवघ्या पाच दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल या उत्सवात होत असते.अलीकडे पलीकडे दुसरा कोणता सण जवळपास नसल्याने हजारो नागरीक यात सहभागी होतात.महिला व मुलांची अमाप गर्दी पाहायला मिळते.

     

   या उत्सवाचे वैशिष्ट्य सांगताना उरूस समितीचे सचिव प्रा.चंद्रकांत जाधव  म्हणाले की हा सण कांहीं केवळ मुस्लिमांचा नसून हिंदू , ख्रिस्त, बौद्ध अशा सर्व धर्मियांचा असतो.याला मोठी यात्रा म्हंटले तरी चालेल.यात बिग बॉस फेम ह.भ. प. शिवलीलालाताई पाटील बार्शीकर या महिला कीर्तनकार यांचे बहारदार कीर्तन होणार आहे, 


महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पण ठेवला आहे. गलफ,संदल तर असेलच शिवाय करमणुकीसाठी  मोफत ऑर्केस्ट्रा  असेल. आकाशी पाळणे, मौत का कुवा,एस्सेल वर्ल्ड,मिकी माऊस सारख्या खेळांची अल्प किमतीत सोय देखील असेल.

   

 उरुसासाठी महारष्ट्र व कर्नाटकातून जवळजवळ दीडशे गावातून यात्रकरू दरवर्षी येत असतात असे समिती अध्यक्ष अमित भोई यांनी सांगितले.


           -------------------------------