ठाणे : चालू वर्षात एस टी च्या ताफ्यात २६४० नव्या बसेस दाखल होतील अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.त्यामुळे लाल परी अधिकाधिक खुलणार असे चित्र आहे.
महाराष्ट्रात रस्ता तेथे बस धावणार असे प्रतिपादन ना.सरनाईक यांनी केले.राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.एस टी मध्ये स्वच्छता आणि सुरक्षितता याला प्राधान्य देणारा मास्टर प्लॅन आपण बनवत आहोत असे त्यांनी सांगितले.यातून एस टी चे आधुनिकीकरण टप्याटप्याने सुरू होईल.
जानेवारीत १५० बसेस दाखल होतील व त्यानंतर दर महिन्याला ३०० नवीन बसेस ताफ्यात दाखल होतील.एस टी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी बोरिवली येथे १०० खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येईल.या हॉस्पिटल मध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा मिळतील.उद्घाटन कार्यक्रमात १७ नवीन बसेस चे लोकार्पण करण्यात आले.परिवहन खात्याच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती प्रसारित करण्यात आली.
-------------------------------------------


