बिबट्या आला रे आला. ड्रोन ने शोधून ही नाही सापडला ; ग्रामस्थात धाक धुक.

Kolhapur news
By -

 

                 


                 


              ( वन विभागाला निवेदन देताना ग्रामस्थ ) 

     

                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     अवचितवाडी ,ठाणेवाडी आणि बोळावी येथे एका पुलावरून उडी मारून जंगलात पळालेला बिबट्या वाटसरूनी पहिला आणि त्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढले. दिसलेल्या या बिबट्याला पकडावे आणि त्याला त्याच्या अधिवासामध्ये सोडावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली. लागलीच वनविभागा मार्फत इन्फ्रारेड ड्रोन द्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली .यामध्ये बिबट्या दिसून आला नाही .मात्र बिबट्याचा वावर या परिसरात असल्याचे ग्रामस्थांकडून  सांगण्यात आले.या रस्त्याने अनेक विद्यार्थी प्रवास करत असतात ,तसेच मुरगुडला कामानिमित्त जाणारे, नोकरीसाठी बाहेरगावी जाणारे नागरिक याच मार्गावरून प्रवास करतात त्यांना या बिबट्याचा धोका संभवू शकतो. त्यामुळे त्याला पकडावे आणि त्याच्या अधिवासामध्ये सोडावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी वन विभागाला निवेदन दिले .


यावेळी  रमेश कांबळे वनक्षेत्रपाल करवीर यांनी हे निवेदन स्वीकारले. त्यांच्या सोबत राहुल जोनवाल वनरक्षक हसूर खुर्द ,वन परिमंडळ कापशी अधिकारी आप्पासाहेब भूरटे उपस्थित होते. बिबट्या दिसला नसला तरी त्याचा वावर कुठेतरी जंगलात असल्याचे नांगर गाव ग्रामस्थ ठामपणे सांगतात.  त्याचा आवाज देखील ऐकल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत .मात्र वन विभागाने तो बिबट्या नसल्याची जाहीर केले आहे. मध्यंतरी मांगनूर येथे आढळलेला बिबट्या हाच असू शकतो अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली आहे .त्यामुळे बिबट्या पुढे निघून गेल्याची शक्यता देखील वनविभागाने बोलून दाखवली .  वनविभागात जंगली प्राणी आल्यानंतर  त्यांची तात्पुरती  पाहणी केली जाते आणि त्यानंतर दुर्लक्ष केले जाते अशी तक्रार ग्रामस्थानी केली आहे. 


    अवचितवाडी ग्रामपंचायत सरपंच संभाजी गायकवाड,उपसरपंच संतोष कारंडे ,बोळावी सरपंच सागर माने, उपसरपंच  रामदास पसारे , सर्जेराव भाट,ओंकार पोतदार, ग्राम पंचायत सदस्य आनंदा पाटिल, शंकर पाटिल, प्रल्हाद मोरे माजी सरपंच मारूति पाटील ,बाळासो पोवार, प्रथमेश सांडूगडे यांनी वनविभागाला  निवेदन सादर केले.

         शोध मोहीम सुरू आहे.

          


            


                 -----------------------------------