गोकुळच्या उत्पादकांना उद्या गोड बातमी

Kolhapur news
By -

           


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      गोकुळ दूध उत्पादकांची सातत्याने ज्या विषयावर मागणी होत असते ,त्याच्या संदर्भात गोकुळच्या संचालक मंडळांनी काही सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरवले आहे . पण आमच्या दोन नेत्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांची संमती घेतल्यानंतर उद्या दूध उत्पादकांना गोड बातमी समजेल असे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले. 


        जनावरांसाठी लागणारा चारा ,पशुखाद्य व  मिळणारा दूध दर याचा विचार करता शेतकऱ्यांना दूध दरवाढ दिली पाहिजे अशी त्यांची गोकुळ कडून अपेक्षा असते .आमच्या दोन्ही नेत्यांची आज  मान्यता मिळेल आणि उद्याच्या वर्तमानपत्रात दूध उत्पादकांना गोड बातमी वाचायला मिळेल असेही अरुण डोंगळे यांनी  सांगितले. 


        ------------------------------