पोलिस किंवा न्यायालयाला पासपोर्ट जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाही: मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Kolhapur news
By -

         


       मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले की पोलिस किंवा न्यायालयाला पासपोर्ट जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी दिलेल्या निकालानुसार, पासपोर्ट कायद्यातील कलमानुसार केवळ पासपोर्ट अधिकारीच पासपोर्ट जप्त करू शकतात.


 सीबीआयने बँक ऑफ बडोदा फसवणूक प्रकरणात नागपूरच्या चित्रपट लेखक व दिग्दर्शक संदीप केवलानी यांचा पासपोर्ट जप्त केला होता. सीबीआयने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमानुसार कारवाई केली आणि विशेष सत्र न्यायालयाने  पासपोर्ट स्वतःच्या ताब्यात घेतला.


उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की , पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून त्याच्या जप्तीसाठी पासपोर्ट कायदा लागू होतो. हा एक विशेष कायदा असल्याने त्याचीच अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. न्यायालयाने सीबीआय व सत्र न्यायालयाची कारवाई अवैध ठरवली . 


       -------------------------------------