सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं फार्म हाऊस लोणावळ्याजवळील आवंढे गावात आहे. एकेकाळी धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत जबरदस्त काम केलेले आहे. आता सध्या ते निवृत्तीचे जीवन जगत आहेत. एकदम आकर्षक आणि लक्झरी असं त्यांचं लोणावळ्याजवळील फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या जवळ एक छोटा तलाव आहे, आणि दुसऱ्या बाजूला जबरदस्त अशी हिरवळीने झाकलेली डोंगररांग नजरेचे पारणे फेडते. बॉलिवूडमध्ये ज्या लक्झरी हौसेस घरांबद्दल बोललं जातं, तसंच अभिनेता धर्मेंद्र यांचं फार्महाऊस देखील सजवलेलं आहे. या घरात सर्व प्रकारच्या सुविधा आढळून येतात . आरामदायक घर, स्विमिंग पूल, फाउंटन, फुलांचे गालीचे बगिचे आणि अगदी गाईंसाठी गोठा देखील आहे. धर्मेंद्र हे आता वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत पण त्यांचा उत्साह त्यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षीही तरुणांपेक्षा कमी नाही. ते रोज व्यायाम करत असतात आणि शेतात फिरण्यासाठी जातात त्यासाठी खास ते एक स्पेशल गाडी वापरतात.
मशहूर अभिनेते धर्मेंद्र यांचे लाईफ आता लोणावळ्यातल्या या शांत आणि सुंदर फार्म हाऊसमध्ये आनंदाने जाताना दिसून येत आहे. ते सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आणि फळे खूप आवडीने खातात. त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता असलेला सनी अनेकदा इथे येऊन भेट देतो. फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कामगारांशी देखील धर्मेंद्र यांचं गोड आणि सलोख्याचं नातं आहे. अभिनेते धर्मेंद्र यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असल्यामुळे सर्वांना ते आपलेसे वाटतात.
- पत्रकार दत्ता पवार
-----------------------------






