अ. भा.मराठी साहित्य संमेलनात अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्न व ज्ञानपीठ पुरस्काराचा ठराव करा :पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी

Kolhapur news
By -

 


               



  सांगली- जगद्विख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असलेला ज्ञानपीठ पुरस्कार व भारतरत्न पुरस्कार मिळण्याचा  98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ठराव करून तो केंद्र शासनाला पाठवून त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिष्टमंडळाने संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भराळकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर शिष्टमंडळाने  डॉ. तारा भवाळकर यांची सांगली येथे भेट घेऊन निवेदन दिले तसेच 22 फेब्रुवारी रोजी संमेलनामध्ये होणाऱ्या लोक साहित्य आणि लोक संस्कृती मंचाला अण्णाभाऊंचे नाव देण्याची  मागणी केली आहे.

 यावेळी वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्येच्या डॉ. सुनिता खटावकर, शिक्षक व इतर कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रा. बाळासाहेब चोपडे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे, राज्य महासचिव अर्चना घोरपडे, महिला आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षा वनिता पवार, वरिष्ठ राज्य संपर्कप्रमुख भानुदास भिसे, राज्य उपाध्यक्ष गुलाब साळवे, शिक्षक कर्मचारी आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्राचार्य कुंभार,  पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी नवले, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस रेणुका बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षासुजाता कांबळे, वरिष्ठ सांगली जिल्हा अध्यक्ष सागर लांडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष विकास पुलवळे, सातारा जिल्हाध्यक्ष शंकर चव्हाण, सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश वाघमारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दौलत घाटगे,पुणे शहराध्यक्षा कविता कसबे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख  मनोज भिसे, पुणे शहराध्यक्ष दिगंबर टिकेकर, पुणे शहर उपाध्यक्षा रेखा काकडे, सांगली जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, मोहोळ तालुका अध्यक्ष कड्याप्पा पवार, वाळवा तालुका अध्यक्ष नामदेव वारे, मिरज तालुकाध्यक्षा रमेजा पठाण,मिरज तालुका उपाध्यक्षा आयेशा होडेकर,महापालिका क्षेत्र अध्यक्षा जुबेदा शेख इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

      


पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना निवेदन देताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा.सुभाष वायदंडे व इतर.

-------------------------------------------------