कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महावितरणाच्या स्मार्ट मीटर विरोधात मुरगूड मध्ये कर्माचाऱ्या बरोबर ग्राहक सुध्दा रस्त्यावर उतरले आहेत.स्मार्ट मीटरचा रीचार्ज संपला की वीजपुरवठा आपोआप बंद होईल.ही आफत रात्री अपरात्री केंव्हाही येऊ शकेल.ही बाब लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांसमवेत ग्राहक संघटना पण रस्त्यावर उतरली असून महावितरण च्या अधिकाऱ्यांना घेराव घालत घोषणा देऊन स्मार्ट मीटर बद्दल नापसंती व्यक्त करण्यात आली.मीटर रीडिंग कर्मचारी बेकार तर होतीलच पण महावितरण या लोकहितवादी मंडळाचे खाजगीकरण होऊन ग्राहकांची पिळवणूक सुरू होईल.
विशेष असे की कोल्हापूर जिल्हा शून्य वीजबिल थकबाकी कडे वाटचाल करत असताना या रिचार्ज वाल्या स्मार्ट मीटरची सक्ती का ? याचा परिणाम म्हणजे आज बी एस एन एल या टेलिफोन कंपनीची अवस्था आहे तशी महावितरणची देखील अवस्था होईल.त्यामुळे हे स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी मागणी जोर धरत आहे.
यावेळी उपकार्यकारी अभियंता उपविभाग मुरगुड शरद कुमार संकपाळ, प्रकाश पाटील सहाय्यक अभियंता मुरगूड शहर शाखा अधिकारी नवनाथ डवरी सहाय्यक अभियंता मुरगुड ग्रामीण शाखा अधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले .तसेच आपली मागणी वरिष्ठापर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रणजीत सूर्यवंशी शिवभक्त सर्जेराव भाट, दगडू शेणवी , ओंकार पोतदार,दत्ता मंडलिक ,संदीप उर्फ गब्बर भारमल, सोमनाथ यरनाळकर उत्तम कापसे,उदय शहा, रंगराव चौगुले ,राहुल शिंदे , अमर चौगुले , जगदीश गुरव संकेत भोसले , प्रशांत सिद्धेश्वर,शुभम वंडकर ओकार महेतर शशिकांत पाटील प्रथमेश ढेरे विश्वजीत रामाने आकाश हरांबळे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
--------------------------------------------

