कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथे शिवतीर्थ परिसरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी झाली.
शिवराज हायस्कूलचे माजी प्राचार्य महादेव कानकेकर व प्रा.संभाजीराव आंगज यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या व सौ.गीता शिंदे ,सौ.योगिनी शेट्टे यांच्या हस्ते जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पत्रकार अनिल पाटील व संकेत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.या दोन थोर विभूतींचे राष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे.जिजाऊ माँ साहेबांनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली आणि स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची पताका शिकागो परिषदेतून जगभर फडकवली .त्यांचा जन्मदिन युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे विचार या वक्त्यांनी मांडले.
यावेळी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर अध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, प्रा.रवींद्र शिंदे,माजी नगरसेवक बजरंग सोनुले,ज्येष्ठ पत्रकार वि. रा. भोसले ,शिवभक्त सर्जेराव भाट,ओंकार पोतदार, तानाजी भराडे,सुनील रणनवरे, महादेव वागणेकर,संग्राम डवरी,युवराज सूर्यवंशी,अशोक खंडागळे,प्रशांत कुडवे,प्रकाश पारिष्वाड,प्रशांत सिध्देश्वर,संकेत शहा जगदीश गुरव , आर. डी, चौगुले,शुभम वंडकर,अमोल कांबळे,वासुदेव मेटकर,शशिकांत मेंडके,तुषार कुलकर्णी,यांचे सह मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल व इतर नागरिक उपस्थित होते.
-----------------------------------

