कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सरवडे ता.राधानगरी येथे बजरंग दलाचे शौर्य संचलन पार पडले.त्यामध्ये असंख्य तरुणांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला .खांद्यावरून केशरी स्कार्फ ,केशरी पताका आणि अत्यंत शिस्तबद्ध संचलन यामुळे कधि नव्हे ते डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यांना स्फुरण चढल्यासारखे झाले. वाहतुकीच्या वाहनांनी अदबीने बाजू करून दिली.गॅलरीत उभ्या असलेल्या नागरिकांनी श्रीराम आणि दुर्गा माता यांच्या भव्य प्रतिमांना हात जोडले.
स्पिकरवर प्रेरणादायक गीत गुंजत होते.
"हर घरमे अब एकही नाम,एकही नारा गुंजेगा.
भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा."
राधानगरी तालुक्यातील ही फक्त सुरुवात होती.
' हिंदुत्वासाठी यायला लागतंय ' असं एक आपुलकीचं आणि तितकंच निर्वाणीचं निमंत्रण युवकांना विश्व हिंदू परिषदेने बजरंग दलासाठी दिलेले असते.
हर हर महादेव म्हणत मावळे जसे शिवरायांच्या मागे उभे राहिले होते तसे असंख्य युवक या संचलनात सहभागी झाले होते.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा तितकासा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रात नव्हता. त्यातही ग्रामीण भागात तर फारच कमी होता.राधानगरीने पहिल्याच फुंकरीत हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित केली आहे.
काय आहे हे हिंदुत्व ?
हिंदुत्व म्हणजे कांहीं एक कट्टर पंथीय किंवा कडवा धर्म नाही. ती एक संस्कार शील आदर्श जीवन पद्धती आहे.सर्व धर्मांना सामावून घेण्याची क्षमता असलेला एक विशाल समुदाय आहे. पर धर्म सहिष्णुता हा हिंदुत्वाचा प्रण आहे.वसुधैव कुटुंबकम ही घोषणा आहे.
कोण म्हणते नफरत पसरवली जाते ?
कोण म्हणतं हिंदुत्वात जातीभेद आहेत ?
ते तर संविधानानेच केंव्हांच पुसून टाकले आहेत.
श्रीराम हे काय आकाशातून आलेले देवदूत नव्हते . समाजातील रावणरूपी दुष्ट प्रवृत्तीचा संहार करण्यासाठी हाती शस्त्र धारण केलेला तो एक महाप्रतापी राजपुत्र होता.
महान भारतीय संस्कृतीचा आराखडा रामाने बाणाच्या टोकाने रेखाटला आहे.
ऋषी मुनींनी रचलेल्या 'शास्त्राला' या राजपुत्राने 'शस्त्राची 'जोड दिली.
म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेल्या भारतीय संविधानाच्या पहिल्या पानावर श्रीरामांचे चित्र आहे.
अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जयघोष विश्व हिंदू परिषदेने स्वीकारला आहे.तो देशभर पोचवायचा आहे.भारत देश कट्टरतावाद्यांच्या हाताला लागू द्यायचा नसेल तर हिंदुत्व जागवले आणि जगवले पाहिजे.
दक्षिण महाराष्ट्रात राधानगरी तालुक्याने शंख फुंकला आहे.गांजा ,गुटखा आणि मद्य यापेक्षा राष्ट्र प्रेमाची नशा कांहीं वेगळीच असते.
राधानगरीच्या युवकांच्या मध्ये शौर्य संचलनात पहायला मिळाली.हळू हळू ती दक्षिण दिग्विजय करु शकेल.
या देशाच्या मातीशी एकरूप असलेले सर्व हिंदू मुस्लिम शिख,इसाई यांच्यात सुध्दा राष्ट्रीयत्वाची नशा पहायला मिळेल असा विश्वास या संचलनाने निर्माण केला आहे.युवक जागा होतोय,पताका फडकवतोय कसलाही धर्म द्वेष त्याच्या रक्तात नाही.बंधुभाव मात्र ठासून भरला आहे.
सोयीच्या राजकारणासाठी कोणी यात 'नफरत' हुंगु नये एवढीच अपेक्षा.
--------------------------------------



