शालेय शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे यांच्या समवेत शिक्षक संघटनांची विविध विषयावर चर्चा

Kolhapur news
By -

                



                       कोल्हापूर न्यूज नेटवर्क

    

    मुंबई : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांचे अध्यक्षतेखाली जयहिंद कॉलेज, मुंबई येथे रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी शैक्षणिक गुणवत्तेसाठी आनंददायी शिक्षण तसेच शिक्षण क्षेत्रातील एकंदरीत अडचणी संबंधाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली. 


        या  कार्यशाळेस राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  रणजित सिंग देओल साहेब, शिक्षण आयुक्त  सचिंद्र प्रताप सिंग साहेब, सेवानिवृत्त प्रधान सचिव  नंदकुमार साहेब, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक  राहुल रेखावार साहेब, योजना प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक  शरद गोसावी साहेब, योजना विभागाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर साहेब, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन साहेब, शिक्षण संचालक  कृष्णकुमार उपस्थित होते. 

          

    यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची  शालेय शिक्षण मंत्री महोदय ना. दादासो भुसे साहेब यांच्या चर्चा  झाली. यावेळी संभाजी थोरात ,प्रसाद पाटील ,अजित कांबळे , उदय शिंदे, केशवराव जाधव ,सुरेश सोनगेकर ,प्रवीण पाताडे, नवनाथ भेंडे , टिपूगडे सर , विजय जाधव ,प्रवीण कांबळे, अरुण हिरवे ,राजेश सदावर्ते या संघटना पदाधिकाऱ्यांच्याकडून विविध मागण्या करण्यात आल्या . त्या खालीलप्रमाणे... 


१) सर्वांना जुनी पेन्शन योजना कार्यान्वित करावी. जिल्हा परिषदेच्या १९/०९/२०१९पूर्वी नियुक्त सर्व प्राथमिक शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय०९/११/२००५ प्रमाणे नियुक्त प्राथमिक शिक्षकांची भरतीची कार्यवाही १/११/२००५पूर्वी सुरु झाली असल्याने त्यांना सरसकट जुनी पेन्शन लागू करण्याचा विकल्प भरून घेवून जुनी पेन्शन योजना लागू करावी.

२) सर्व शाळांना संगणक व इंटरनेट सुविधा पुरविण्यात यावी. ऑनलाईन कामांची सक्ती करू नये. प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा पुढील टप्पा जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणे पूर्वी तात्काळ जानेवारी 2025 मध्ये राबविण्यात यावा. तसेच ह्यापूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली संधी मिळण्यासाठी 10 वर्षे पात्रतेची अट पूर्णतः रद्द करण्यात यावे.. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची पुर्वीच्या जिल्ह्यातील सेवा ग्राहय धरण्यात यावी.

३) शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी या पदांसाठी प्राथमिक शिक्षकांना स्पर्धा परिक्षांसाठी संधी देण्यात यावी.

४) MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि राज्यसेवा सरळ सेवा महाराष्ट्र शिक्षण सेवा १, २ मध्ये शैक्षणिक अहर्ता (DED, BED) आणि शैक्षणिक अनुभव यांची अट घातली जावी.

५) प्रशासकीय अधिकारी/प्रशासन अधिकारी गट अ व ब, आरोग्य/उच्चतंत्र शिक्षण / कृषी विभाग / आयुष मंत्रालय तसेच इतर तत्सम विभागीय परीक्षा मध्ये प्राथमिक शिक्षकांना संधी उपलब्ध करण्यात यावी.

६) जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा प्रवेश नियम १९६७ च्या सेवा प्रवेश नियमात सद्य स्थितीनुसार आवश्यक सुधारणा करण्यात यावी.

७) संविधानाच्या अमृत. महोत्सवी वर्षात हर घर साबिधान मोहीम शासनाच्या वतीने राबवावी...

८) Blo सारख्या अशैक्षणिक कामातून व ऑनलाईन कामाचा अतिरेक थांबवा.

९) मुख्यालय सक्ती बंद करा.


----------------------------------------------------------

 

मागासवर्गीय शिक्षकांना इतर राज्याप्रमाणे पदोन्नती आरक्षण लागू करा


मागासवर्गीय सरळ सेवा भरती अनुशेष भरून काढा.


उपस्थिती भत्ता योजनेच्या रकमेत वाढ करा.


  ----------------------------------------------------------