मुलांच्या समवेत भोजनानंतर व्यवसायिकाची पत्नीसह आत्महत्या

Kolhapur news
By -

 

            


नाशिक :दोघा मुलांसोबत रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर घरात दोघेच असलेल्या व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना टिळकवाडीतील 'यशोकृपा' या बंगल्यात घडली. हा प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी व्हिसेरा राखूनठेवला आहे. जयेश रसिकलाल शहा (५८) व त्यांची पत्नी रक्षा जयेश शहा (५६) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळकवाडीतील रहिवासी तथा एफएमसीजी व्यावसायिक असलेल्या या दोघांनी जीवनयात्रा संपविल्याचा प्रकार समोरआला आहे. शहा दाम्पत्याने आपल्यादोघा मुलांसमवेत रविवारी (दि. ५) रात्री नेहमीप्रमाणे १० वाजेच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर दोघेही मुले त्यांच्या कामासाठी बाहेर गेले. त्यानंतरशहा पती-पत्नी त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यानंतर तासाभराने साधारणतः ११.३० वाजण्याच्या सुमारास रक्षा शहा यांनी आपला मोठा मुलगा कौशल यास फोन केला. फोनवर त्या तुटक आणि अडखळत घाबरलेल्या स्थितीत बोलत असल्याचे कौशलच्या लक्षात आले. फोन ठेवताच मुलाने घरी धाव घेतली असता त्याला खोलीत दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्याने लागलीच दोघांना कारमधून नेत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.


मात्र, प्रकृती खालावल्याने दोघांनाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दम्यान पहाटे दोघांचामृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांनी शहा दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळून आले. संशयास्पद कोणतीही  वस्तू अथवा आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. शहा दाम्पत्य समाजात प्रतिष्ठित होते. दाम्पत्यावर एकाचवेळी विद्युत दाहिनीत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच टाहो फोडल्याने उपस्थित सर्वांचे मन हेलावले.


               मुलाच्या विवाहाची तयारी


शहा दाम्पत्याने त्यांचा आर्किटेक्ट असलेला लहान मुलगा अतिथ याच्याविवाहाची तयारीही सुरू केली होती. २६ जानेवारीला हा विवाह सोहळाहोणार आहे. शहा यांचे भाऊ वपुतण्यांचा मोठा बांधकाम व्यवसायअसून मोठा मुलगा कौशल हाव्यवसायात सहभागी होता. लग्नामुळेआनंदाचे वातावरण असतानाच हीघटना घडल्याने सर्वांनाच धक्काबसला आहे.

     

           ------------------------------