प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन नियम लागू : कुटुंबातील सर्व सदस्यांचे.....

Kolhapur news
By -

 

          


   नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत  शेतकऱ्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार, शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करणे व शेतकरी ओळख क्रमांक    घेणे अनिवार्य असेल.


         शेतकऱ्यांसाठी नवीन अटी... 


१९वा हप्ता : २४ फेब्रुवारी रोजी वितरीत होणार असून, यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक नाही.

२०वा हप्ता : यापासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य होणार आहे.

नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी व १८ वर्षांखालील कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक जोडणे बंधनकारक असेल.


सीएससी केंद्रातून शेतकरी ओळख क्रमांक मिळवा... 


शेतकरी जवळच्या सीएससी  केंद्रावर जाऊन शेतकरी ओळख क्रमांक मिळवू शकतात.


नोंदणी अद्ययावत नसलेल्या शेतकऱ्यांवर परिणाम... 

जमिनीच्या नोंदी अद्ययावत नसलेल्या ७८ हजार शेतकऱ्यांना तसेच ई-केवायसी व आधार लिंकिंग न झालेल्या लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो.


नियमांचे पालन करूनच पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार असल्याने, शेतकऱ्यांना त्वरित आपली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.


          -------------------------------