कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विश्व विजेत्या भारतीय खोखो संघात स्टार खेळाडू म्हणून चमकलेल्या वैष्णवी पोवार हीचा मुरगूड मधील शिवतीर्थावर भव्य सत्कार करण्यात आला .
वैष्णवी ही करंजीवणे येथील असून भारतीय खोखो संघात तिची निवड झाली होती.
नेपाळ बरोबर झालेल्या अंतिम सामन्यात ती साडे आठ मिनटे खेळली.हा खेळच संघाला विश्व विजेतेपद मिळवून देणारा ठरला असे तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले.
तिचे वडील बजरंग पोवार यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारा पूर्वी बाजार पेठेतून तिची मिरवणूक काढण्यात आली.
नगरपरिषद मुरगूड च्या महिला कर्मचाऱ्यांनी वैष्णवी चे औक्षण केले.शिवछत्रपतींची प्रतिमा देवून जयजय कार करण्यात आला.
प्रास्ताविक शिवराज चे माजी प्राचार्य महादेव कांनकेकर यांनी व सूत्र संचालन ओंकार पोतदार यांनी केले.
शिवभक्त सर्जेराव भाट व जगदीश गुरव,तानाजी भराडे , पा रेश्वाड ई. शिवभक्तांनी या सत्काराचे आयोजन केले होते.नागरिकांची व क्रीडा प्रेमिंची मोठी गर्दी होती.
---------------------------------------


