कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे येथे होणाऱ्या विश्व मराठी संमेलनात बेळगावच्या हर्षदा सुंठणकर यांची निमंत्रित कवयित्री म्हणून निवड झाली आहे. कविवर्य रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, विठ्ठल वाघ, किशोर कदम, वैभव जोशी, अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत त्या कविता वाचतील.
हर्षदा सुंठणकरांचा कपडे वाळत घालणारी बाई हा कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्याला बारा मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची कविता महाराष्ट्रात एम. ए. च्या आणि मध्यप्रदेशात बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड अशा विविध राज्यातील कविसंमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग नोंदवला आहे. एबीपी माझा, सह्याद्री या वाहिन्यांवरून त्यांनी कविता वाचन केले आहे.
------------------------------------

