स्व.संदीप वडगुले यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त नानीबाई चिखलीतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Kolhapur news
By -

                  

    

          



                      काेल्हापूर न्यूज नेटवर्क


        कै.संदीप अण्णासो वडगुले यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त एकता तरुण मंडळाच्यावतीने कन्या विद्या मंदिर चिखली,कुमार विद्यामंदिर चिखली चिखली, इंग्लिश स्कूल चिखली, यशवंतराव भोसले माध्यमिक विद्यालय खडकेवाडा या शाळांमध्ये  वह्यांचे वाटप करण्यात आले .


    यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक युवा नेते प्रवीणदादा भोसले ,माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद ,मंडळाचे अध्यक्ष सचिन सूर्यवंशी , उत्तम पाटील, विनायक बेनाडे, अविनाश पोतदार ,झाकीर नाईक, सुनील वडगुले,अजित बेनाडे, मन्सूर मजावर,सागर कांईगडे, सुरज बेनाडे ,अजित शिंदे, महेश मगदूम, संजय सकपाळ आदी सदस्य उपस्थित होते.


          -----------------------------------


              बक्षीस वितरण सोहळा


भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त स्व. संदीप अण्णासाहेब वडगुले यांच्या स्मरणार्थ कृष्णा वडगुले यांनी चिखली शिक्षण संस्था चिखली संचलित यशवंतराव भोसले माध्यमिक विद्यालय खडकेवाडा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले .

  तसेच विद्यालयात पार पडलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड ,वही ,कंपास व पेनचे वितरण करण्यात आले .अण्णासाहेब वडगुले यांनी दाखवलेले दातृत्व आणि मनाचा मोठेपणा आमच्या शाळेला एक नवीन प्रेरणादायी मदत आहे, असे  मत बक्षीस वितरण प्रसंगी मुख्याध्यापक एस बी लोकरे यांनी व्यक्त केले .यावेळी खडकेवाडाचे उदयकाका घोरपडे ,माजी मुख्याध्यापक भोसले सर, विनायक कांबळे ,अभिजीत भोळे , विनोद पाटील उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एस कांबळे यांनी केले .आभार आर पी कुंभार यांनी मानले. 

           

        विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर 

     

    यशवंतराव भोसले माध्यमिक विद्यालय खडकेवाडा मधील विद्यार्थ्यांना स्व.संदीपच्या स्मरणार्थ  "पाणी फिल्टर " ही भेट देणार असल्याची माहिती अण्णासाहेब वडगुले यांनी दिली. 


   --------------------------------------------------