प्राध्यापक होण्यासाठी आता NET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक नाही ; प्राध्यापक होण्यामधील मोठा अडथळा झाला दूर

Kolhapur news
By -

               

   ( केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मार्गदर्शक सूचना जाहीर करताना 

       

   नवी दिल्ली :आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी यूजीसी NET परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उच्च शिक्षण संस्थामध्ये प्राध्यापक भरती आणि पदोन्नतीसाठी यूजीसी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. त्यानुसार सहायक प्राध्यापक भरतीसाठी या विषयात नेट उत्तीर्ण असणे आवश्यक नाही.


  मसुदा मार्गदर्शक तत्त्वे यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली आहेत. उद्योग तज्ज्ञ आणि भागधारकांच्या अभिप्राय आणि सूचना घेतल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील. यूजीसीची ५ फेब्रुवारीनंतर मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार आहेत .


सध्या लागू UGC मार्गदर्शक तत्त्वे 2018 नुसार, सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी, उमेदवाराने ज्या विषयात पदव्युत्तर (PG) केले आहे त्याच विषयात NET पात्र असणे आवश्यक होते. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, उमेदवारांना पीजी व्यतिरिक्त इतर विषयांमधून नेट करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच, नेटशिवाय, थेट पीएच.डी केलेले उमेदवारही सहायक प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करू शकतील.


                  --------------------